"छत्रपती संभाजीनगरच्या मातीतून फुललेली, ३१ वर्षांच्या अनुभवाची शिखर गाठलेली, आणि हजारो नागरिकांच्या विश्वासाची पायरी चढलेली ही पतसंस्था आर्थिक, सामाजिक क्षेत्रात अमुल्य योगदान देत आहे आणि आम्ही आमच्या “आपल्या स्वप्नपूर्तीसाठी, आपुलकीचा हातभार...!” ब्रीदवाक्यप्रमाणे हजारो ग्राहकाच्या स्वप्नासाठी हातभार लावत आहोत.
१२०० कोटींचा व्यवसाय आणि २३ शाखा या आकड्यांमागे आहे एक अविरत प्रयत्न, एक समर्पित माननीय संचालक मंडळ आणि एक दृष्टिकोन. मराठवाड्यातील अग्रगण्य आर्थिक पतसंस्था म्हणून, आम्ही सदैव आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम दर्जाची बँकिंग सुविधा पुरवण्यासाठी वचनबद्ध आहोत. आमचे तत्पर व प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आणि कोअर बँकिंग सारख्या आधुनिक प्रणालीद्वारे आम्ही ग्राहकांच्या प्रत्येक गरजेला प्रतिसाद देतो.
आम्ही केवळ आर्थिक उन्नतीचे स्वप्न पूर्ण केले नाही, तर सामाजिक जबाबदारीचेही ध्येय साध्य केले. रक्तदान शिबिरांमधून जीवदान, स्वच्छता अभियानांमधून निरोगी समाज, वृक्षारोपणामधून हिरवेगार भविष्य आणि महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून घरातील प्रत्येक घटकाचा आर्थिक विकास हे आमचे ध्येय आहे आणि ते आम्ही पूर्ण करत आहोत.
या पुढेही ही पतसंस्था समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहील."
शाखा विस्तार, ठेवी १,००० कोटी, सभासद संख्या १,००,०००, सातत्य लेखा परिक्षण ‘अ’ वर्ग मिळवण्याचे, सेवेतून नफा, नफ्यातून सेवा.